मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली , 30 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वाढता प्रभाव आणि तांत्रिक भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. माहितीनुसार, नडेला डिसेंबर महिन्यात दिल्ली, मुंबई आण
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर


नवी दिल्ली , 30 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वाढता प्रभाव आणि तांत्रिक भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. माहितीनुसार, नडेला डिसेंबर महिन्यात दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू या शहरांना भेट देतील, जिथे ते सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, नडेला आपल्या या दौऱ्यादरम्यान एआय संबंधित अनेक महत्त्वाच्या परिषदांना संबोधित करतील. जरी कंपनीकडून त्यांच्या या भेटीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, तरी हा दौरा मायक्रोसॉफ्टसाठी रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ही भेट अशा काळात होत आहे, जेव्हा भारत आणि अमेरिका यांचे संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. दोन्ही देश अलीकडील मतभेद मागे सोडून तांत्रिक भागीदारीवर अधिक भर देत आहेत.

दुसरीकडे, भारत सरकार ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत स्वदेशी ऍप्स आणि सेवांचा प्रसार करत आहे, ज्यामुळे जोहो कॉर्पेरेशन सारख्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपन्यांच्या तुलनेत कमी खर्चिक पर्याय म्हणून पुढे येत आहेत.

सत्य नडेला यावर्षी जानेवारी 2025 मध्येही भारतात आले होते, जिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि देशातील एआय क्षेत्रात 3 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. आता डिसेंबरमधील हा दौरा त्यांच्या त्या व्हिजनला पुढे नेणारा आणखी एक टप्पा मानला जात आहे.

भारतात एआय क्षेत्रात स्पर्धा झपाट्याने वाढत आहे. अलीकडेच गुगल ने आंध्र प्रदेशात एआय डेटा सेंटर उभारण्यासाठी पुढील पाच वर्षांत 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, मायक्रोसॉफ्ट समर्थित ओपनएआय ने भारतीय वापरकर्त्यांसाठी चॅटजीपीटीगो चे एक वर्षाचे मोफत सब्स्क्रिप्शन देण्याची घोषणा केली आहे. सत्य नडेला यांचा हा दौरा भारतातील एआय आणि क्लाउड तंत्रज्ञानाच्या विकासाला नवी गती देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande