
नांदेड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे सीमा सुरक्षा बलातील शूर जवान रामेश्वर भाऊराव बंडगर (रा. बिजूर, ता. बिलोली, जि. नांदेड) यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायक आहे. अशा शब्दात देगलूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विशेष अंतापूरकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते २९ वी बटालियन, आरदपूर, जिल्हा वालदा (पश्चिम बंगाल) येथे कर्तव्य बजावत होते. देशाच्या सीमांवर निष्ठेने सेवा करत असताना आजारपणामुळे ते काही काळ उपचार घेत होते. दुर्दैवाने, उपचारादरम्यान नांदेड येथे त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना आयुष्य वाहून घेणाऱ्या अशा वीर जवानांचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे. त्यांचे देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, असे ते म्हणाले
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis