
मुंबई, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने एक महत्त्वाचा उपक्रम राबवत स्तनाच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. ज्या विषयावर खासगीतही चर्चा होत नाही, अशा विषयावर मोकळेपणाने चर्चा होईल यासाठी प्रयत्न तर केलेच पण या उपक्रमाद्वारे 'GUINNESS WORLD RECORDS®' स्थापित करून हा संदेश जागतिक स्तरावर नेऊन ठेवला आहे. 'हग ऑफ लाईफ' हा संदेश देणाऱ्या गरम पाण्याच्या 1,191 पिशव्या वापरून थँक्स-ए-डॉटच्या साहाय्याने स्तनांची स्वतःची तपासणी करा हा संदेश देणारा सर्वात मोठा मोझेक तयार केला आहे. हा प्रयत्न केवळ लवकर निदान आणि स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्वच अधोरेखित करत नाही तर भारतात अजूनही ज्या विषयाबाबत पूर्णपणे मोकळेपणा नाही अशा महिलांच्या आरोग्याबद्दलच्या महत्त्वाच्या संभाषणाला देखील चालना देतो.
एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री. अमित झिंग्रान, भारतीय अभिनेत्री आणि स्तनाच्या कर्करोगावर यशस्वी मात केलेली श्रीमती महिमा चौधरी; एसबीआय लाईफचे कॉर्प कम्युनिकेशन आणि सीएसआरचे ब्रँड चीफ श्री. रवींद्र शर्मा; GUINNESS WORLD RECORDS® चे अधिकृत परीक्षक श्री. स्वप्नील डांगरीकर आणि इतर मान्यवरांनी या विक्रमी मोझेकला भेट दिली.
भारतीय महिलांमध्ये प्रामुख्याने स्तनाचा कर्करोग आढळतो. कर्करोगाच्या चार पैकी एका रुग्णामध्ये हा प्रकार दिसतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, भारतातील 60% पेक्षा जास्त स्तन कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आजाराचे निदानच पुढच्या टप्प्यात होते. जेव्हा उपचार मर्यादित असतात आणि त्यामुळे जगण्याचा दर कमी होतो. मात्र, स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास ९०% पर्यंत रुग्ण बरे होतात. सांस्कृतिक संकोच, कलंक आणि वैयक्तिक काळजीपेक्षा कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य देणे यामुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतात.
एसबीआय लाईफच्या 2019 मध्ये सुरू झालेल्या थँक्स-ए-डॉट उपक्रमाचे उद्दिष्ट महिलांना स्तनांच्या आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित करणे हे तर आहेच. पण दैनंदिन जीवनात नियमितरित्या स्व-परीक्षण करून हे अडथळे दूर सारणे हे देखील आहे.
2023 मध्ये, एसबीआय लाईफने 'हग ऑफ लाईफ' हा संदेश देणारी हॉट वॉटर बॅग सादर केली, जी जगातील पहिली त्रिमितीय गाठी असलेली बॅग आहे. महिलांना सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने स्व-स्तन तपासणी करण्यास मदत म्हणून डिझाइन केली गेली आहे. या जागरूकतेसाठी तयार करण्यात आलेल्या या विक्रमी मोझेकमुळे कर्मचारी, भागीदार आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणले. याच्या या अनोख्या रचनेमुळे रोजच्या जगण्यातील वस्तू जागरूकता आणि सक्षमीकरणाचे शक्तिशाली प्रतीक ठरते आहे.
या उपक्रमाबद्दल एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या कॉर्पोरेशन कम्युनिकेशन आणि सीएसआरचे ब्रँड चीफ श्री. रवींद्र शर्मा म्हणाले, “कुटुंबांचे पालनपोषण करण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असली तरी कौटुंबिक आरोग्याच्या बाबतीत त्यांचा नंबर शेवटचा असतो. एसबीआय लाईफच्या थँक्स-ए-डॉटद्वारे, आम्ही महिलांना केवळ स्तनांची स्व-तपासणी करण्यास प्रोत्साहित करत नाही, तर आम्ही एक अशी चळवळ निर्माण करत आहोत जी वैयक्तिक काळजीला प्रोत्साहन तर देईलच पण घरी तसेच समाजामध्ये देखील याबाबत जागरूकता निर्माण करेल. स्वतः स्वतःची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःची काळजी घेणे हे खरे तर एका मोठ्या जबाबदारीचा भाग म्हणून आम्ही पाहतो. कारण तुमच्या प्रियजनांची काळजी घेण्याची खरी सुरुवात स्वतःची काळजी घेण्यापासूनच होते. GUINNESS WORLD RECORDS® साध्य करणे हा केवळ एक मैलाचा दगड नाही तर त्यापेक्षाही जास्त आहे. महिलांना स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देण्यासाठी तसेच स्तनांच्या स्व-तपासणीची नियमित सवय बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.”
भारतीय अभिनेत्री आणि ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायव्हर महिमा चौधरी म्हणाल्या, “एसबीआय लाईफच्या थँक्स अ डॉटशी जोडले जाणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ते लवकर निदानाचे महत्त्व पटवून देते. स्वतः ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज दिल्यामुळे लवकर निदान किती महत्त्वाचे आहे, हे मला माहीत आहे. तसेच नियमितरित्या स्तनांची स्वतः तपासणी केल्याने किती फरक पडतो. मात्र, या विषयावरील संभाषणात अजूनही तेवढा मोकळेपणा नसल्याने एसबीआय लाईफच्या ‘थँक्स अ डॉट’ उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होते. अशा उपक्रमांची जागतिक स्तरावर दखल घेऊन मिळालेला GUINNESS WORLD RECORDS® हा सन्मान अशा संभाषणांची वाट अधिक सोपी करतो. याबरोबरच महिलांना शिकण्यासाठी, कृती करण्यासाठी तसेच स्वतःला सक्षम करण्यासाठी प्रेरित करतो.
हा उपक्रम एसबीआय लाईफच्या 'अपने लिए, अपनों के लिए' या तत्त्वज्ञानाला बळकटी देतो. नावीन्य, दुसऱ्याचा विचार करणे आणि उद्देश यांचा मेळ घालून, कंपनी स्तनांचे स्व-परीक्षण ही एक सवय बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते, संकोच नाही. तसेच आर्थिक कल्याणासोबतच महिलांना स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर