
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर , कंकराळा , सोयगाव शिवारात सातत्याने झालेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतमालाची शेताच्या बांधावर जावून पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 3- 4 दिवसांत ईकेवायसी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचे अनुदान जमा होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा असे सांगितले. ज्यांची ईकेवायसी झाली नसेल त्यांनी ईकेवायसी करून घ्यावी असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis