अकोला : विजय मालोकार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। अकोल्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले विजय मालोकार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत झ
P


अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

अकोल्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले विजय मालोकार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने अकोला जिल्ह्यात पक्षांतरणाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. विजय मालोकार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अकोला जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून शासनाच्या विविध समित्यांवरही काम केले आहे. यासोबतच शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्क प्रमुख व हिंगोली जिल्ह्यातील नेते डॉ. रमेश शिंदे पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, युवासेना, भाजपा, शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच मोठा पक्ष प्रवेश झाला. त्यांनतर जालना जिल्ह्यात व नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे विविध पक्षातून नेते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात आणखी महत्वाचे नेते लवकरच प्रवेश करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande