
नांदेड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील सारखणी येथील युवा कार्यकर्ते पिंटू पाटील यांच्यासह युवकांनी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नांदेडचे आमदार हेमंत पाटील माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना साखरणी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा समजला जातो आहे.शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार सर्व सामान्य जनतेमध्ये रुजविण्याचे वचन दिले. यावेळी तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक,आरविंद पाटील, भास्कर पाटील, ईश्वर पाटील,सचिन कलाने, रवी तोंडकुलवार, बालाजी गायकवाड,प्रदीप भोसले, प्रणय राऊत, कलाजी गायकवाड,श्रीकांत पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis