नांदेड - पुणे वंदे भारत लवकर सुरू होणार- खा.डॉ. अजित गोपछडे
नांदेड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।नांदेड - पुणे रेल्वे प्रवास आता अति जलद गतीने होणार असून या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश येत असून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नांदेड - पुणे वंदे भारत एक्स्प्रे
नांदेड - पुणे वंदे भारत लवकर सुरू होणार- खा.डॉ. अजित गोपछडे


नांदेड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।नांदेड - पुणे रेल्वे प्रवास आता अति जलद गतीने होणार असून या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश येत असून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नांदेड - पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल दिला आहे.

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक रेल्वे सुविधा मिळावी , मराठवाड्याचा जलद गतीने विकास व्हावा आणि जलद रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून घेतल्यानंतर खा. डॉ .अजित गोपछडे आता नांदेड - पुणे आणि नांदेड - हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस साठी प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांनी पत्र दिले होते.

खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या निवेदनानुसार केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नांदेड - पुणे वंदे भारत एक्सप्रेस ला ग्रीन सिग्नल दिला असून आता या मार्गावर लवकरच अति जलद प्रवास सुरू होणार आहे. पुणे शहर महाराष्ट्रातील शैक्षणिक पंढरी असल्याने या ठिकाणी नांदेड आणि मराठवाड्यातील असंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी आहेत. नोकरी , व्यवसायासाठी , उद्योगधंद्यासाठी ही असंख्य व्यापारी , उद्योजक , नागरिक पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत . त्यामुळे पुणे , मराठवाडा आणि नांदेडची मोठी कनेक्टिव्हिटी असून वंदे भारत एक्सप्रेसमुळे ही कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे मराठवाड्याच्या व्यावसायिक वृद्धीसाठी मोठी मदत होणार असल्याने मराठवाड्याच्या विकासाला आणखीन एक जलद गतीचा नवा मार्ग मिळेल असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande