अँडी फ्लॉवर यांची लंडन स्पिरिटच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
लंडन, ४ ऑक्टोबर (हिं.स.) : इंग्लंडचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची अनेक वर्षांच्या करारावर लंडन स्पिरिटच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फ्लॉवर यांनी यापूर्वी ट्रेंट रॉकेट्सचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्यांनी पाच
अँड फ्लावर


लंडन, ४ ऑक्टोबर (हिं.स.) : इंग्लंडचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची अनेक वर्षांच्या करारावर लंडन स्पिरिटच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फ्लॉवर यांनी यापूर्वी ट्रेंट रॉकेट्सचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ बजावला होता. आणि २०२२ मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

५७ वर्षीय फ्लॉवर यांनी २००९ ते २०१४ पर्यंत इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. त्यांनी अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. त्यांच्यासोबत लंडन स्पिरिटचे क्रिकेट संचालक मो बोबॅट होते.फ्लॉवर यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची जागा घेतली आहे. ज्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ निराशाजनक सातव्या स्थानावर संपला होता. फ्लॉवर म्हणाले की. लंडन स्पिरिटमध्ये सामील होण्यास आणि होम ऑफ क्रिकेट येथे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेचा भाग असणे हे एक भाग्य आहे. मी पुन्हा मो सोबत आणि एमसीसी आणि टेक टायटन्ससोबत पहिल्यांदाच काम करण्यास उत्सुक आहे.

क्रिकेट संचालक मो बोबट म्हणाले, अँडी फ्लॉवर यांची सेवा मिळवणे ही आमच्यासाठी एक मोठी कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्यांचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्यांच्यासोबतचा माझा पूर्वीचा अनुभव अत्यंत सकारात्मक राहिला आहे. आणि मला विश्वास आहे की, आम्ही लंडन स्पिरिटसोबत एक नवीन आणि विशेष सुरुवात करू.ते पुढे म्हणाले, २०२५ च्या हंगामात पूर्ण समर्पण आणि सचोटीने संघाचे नेतृत्व करणाऱ्या जस्टिन लँगर यांचेही मी आभार मानू इच्छितो.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande