बांगलादेशची दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानवर २ विकेट्सने मात
शारजाह, ४ ऑक्टोबर (हिं.स.) : दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशने रोमांचक पद्धतीने अफगाणिस्तानचा २ विकेट्सने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने निर्णायक आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ५ बाद १४७ धावा केल्या आणि प्रत्य
बांग्लादेशचा विजेता संघ


शारजाह, ४ ऑक्टोबर (हिं.स.) : दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशने रोमांचक पद्धतीने अफगाणिस्तानचा २ विकेट्सने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने निर्णायक आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ५ बाद १४७ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात बांगलादेशने १९.१ षटकांत ८ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.

गोलंदाजीत, शोरिफुल इस्लाम (१/१३), मोहम्मद सैफुद्दीन (०/२२) आणि नसुम अहमद (२/२५) यांनी किफायतशीर गोलंदाजी करत अफगाणिस्तानला १47 धावांवर रोखले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीरांना बांग्लादेशने केवळ २ धावांत गमावले. चौथ्या षटकापर्यंत धावसंख्या १६/२ होती. आणि पाचव्या षटकात सैफ हसनही बाद झाला. केवळ २४ धावांत तीन विकेट गेल्या असताना, शमीम हुसेन आणि जाकेर अली यांच्यावर जबाबदारी आली. त्यांनी ५६ धावांची भागीदारी करून संघाला पुन्हा सामन्यात पुनरागमन करुन दिले.

जाकेर अलीने रशीद खानच्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार मारला पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. शमीम (३३) देखील जास्त काळ टिकू शकला नाही. महत्त्वाच्या क्षणी मोहम्मद नबीच्या चेंडूवर नुरुल हसनने सलग दोन षटकार मारले आणि सामन्याला कलाटणीला दिली. पण उमरझाईने एकाच षटकात दोन विकेट्स घेत बांगलादेशच्या अडचणी वाढवल्या. शेवटच्या १२ चेंडूत १९ धावांची गरज असताना, नूर अहमदने १९ व्या षटकात १७ धावा दिल्या. त्यानंतर शोरीफुलने शेवटच्या षटकात चौकार मारून बांग्लादेशच विजयावर शिक्कामोर्तब केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande