नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर (हिं.स.): भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने २०२५ ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये चौथ्या स्थानावर आपली मोहीम संपवली. आणि ४०,००० डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळवली. २० वर्षीय या खेळाडूला तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात अनुभवी ग्रँडमास्टर लेव्हॉन अॅरोनियनविरुद्ध कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. आर्मेनियन स्टारने सलग तीन गेम जिंकून तीन गेम शिल्लक असताना विजय मिळवला.
या स्पर्धेता चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी, चार खेळाडूंच्या एलिट फायनलमध्ये प्रज्ञानंदाची प्रगती त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रतिबिंब आहे, त्याने जागतिक दर्जाचे ग्रँडमास्टर फॅबियानो कॅरुआना, ग्रँडमास्टर मॅक्सिम वाचियर-लाग्राव्ह आणि अॅरोनियन यांना कडवी टक्कर दिली. टॉप तीनमध्ये स्थान मिळवून या तिघांनी २०२६ ग्रँड चेस टूरमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
पहिला गेम वाचियर-लाग्राव्हविरुद्ध गमावल्यानंतर कारुआनाने जोरदार पुनरागमन केले. अमेरिकन खेळाडूने सलग तीन गेम जिंकून सामन्यावर नियंत्रण मिळवले. अंतिम गेममध्ये वाचियर-लाग्राव्हने जवळजवळ प्लेऑफ स्थान निश्चित केले होते. पण दबावाखाली झालेल्या एका महत्त्वाच्या चुकीमुळे कारुआनाला विजेतेपद आणि 150,000 डॉलर्सचे सर्वोच्च बक्षीस जिंकता आले. लाग्राव्हला 100,000 डॉलर्स मिळाले, तर अरोनियनला 60,000 डॉलर्स मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे