पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
नवरात्र उत्सव व विजयादशमी चे औचित्य साधून हिंदू शौर्य दिनानिमित्त विराट हिंदू मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. रविवारी (दि.५ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता आरंभ बँक्वेट हॉल (भोईर लॉन्स), ज्योतिबा गार्डन जवळ, काळेवाडी बिआरटी रोड, काळेवाडी, पिंपरी येथे या हिंदू विराट मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे भारत, विश्वमित्र ते विश्वगुरू या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यावेळी स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामराजे बेंबडे यांना 'स्वर्गीय प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाज भूषण पुरस्कार २०२५' देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पिंपरीतील दै. लोकमतचे वृत्त संपादक डॉ. विश्वास मोरे यांना 'स्वर्गीय संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण २०२५' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव उत्तम दंडीमे यांनी दिली. दसरा मेळाव्याचे समन्वयक कैलास बारणे यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या संयोजनात सुहास पोफळे, दत्तात्रय सूर्यवंशी, अतूल आचार्य, कुमार जाधव, नामदेव शिंत्रे आदींनी सहभाग घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु