सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी ६ ऑक्टोबर व मंगळवार ७ ऑक्टोबरला तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होणार आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यांतून भाविक तुळजापूरला येतात. या काळात अनेक भाविक सोलापूरहून पायी चालत तुळजापूरकडे जातात. त्यामुळे सोलापूर–तुळजापूर मार्गावर गर्दी व अपघाताची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी यासंदर्भातील आदेश जाहीर केला असून शनिवारी ४ ऑक्टोबर पहाटे १२.०१ वाजल्यापासून ते मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका ते तुळजापूर शहर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड