बीड, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : बीड शहरातील पत्रकार मित्र देवेंद्रसिंग ढाका यांच्या यश (वय २२ वर्षे) या तरुणाची बीड शहरात काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज बीड शहरात ढाका परिवाराची आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
तरुण उमद्या पोटच्या मुलाची हत्या झाल्याचे दुःख हे न पेलेवणारे आहे. त्यामुळे यश ढाका याला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत मी पूर्ण शक्तीने ढाका कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे, असा शब्द ढाका कुटुंबीयांना दिला. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, सुरू असलेल्या तपासाची माहिती घेतली. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र भाऊ फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित दादा पवार यांच्याहीही चर्चा करणार असल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis