सीनेच्या महापुराने महावितरणचे 24 कोटींचे नुकसान
सोलापूर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुराने महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत नदीकाठच्या 95 गावांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला तर सुमारे 24 कोटी रूपयांचे नुकसान झाले, अशी माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अ
सीनेच्या महापुराने महावितरणचे 24 कोटींचे नुकसान


सोलापूर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)।

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुराने महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत नदीकाठच्या 95 गावांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला तर सुमारे 24 कोटी रूपयांचे नुकसान झाले, अशी माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे 33/11 केव्ही क्षमतेचे एकूण 19 उपकेंद्र अतिवृष्टीमुळे व पुराचे पाणी उपकेंद्रात गेल्याने बंद करण्यात आले होते.

करमाळा तालुक्यातील आवाटी, मोहोळ तालुक्यातील लांबोटी व भांबेवाडी, माढा तालुक्यातील कुंभेज, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद, हत्तरसंग कुडल व वडकबाळ, अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव, गुड्डेवाडी ही उपकेंद्र बाधित झाली होती. त्यामुळे 11 केव्ही क्षमतेच्या एकूण 92 वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सदर 92 वाहिन्या बंद असल्याने एकूण 28 हजार 59 घरगुती ग्राहक व 39 हजार 41 शेती पंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालेला होता, अशी माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande