कोलंबो, 4 ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय महिला संघ रविवारी होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयारी करत आहे. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषकाच्या गट टप्प्यात भारत आणि पाकिस्तान महिला संघ आमनेसामने येतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक विचित्र घटना आधीच घडली आहे. शुक्रवारी भारतीय महिला संघ सराव करत असताना, स्टेडियममधून साप सरकताना दिसला.
आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये साप दिसणे असामान्य नाही. लंका प्रीमियर लीग सामन्यांदरम्यान आणि या वर्षी जुलैमध्ये श्रीलंका-बांगलादेश एकदिवसीय सामन्यादरम्यानही साप स्टेडियममध्ये घुसले होते. शुक्रवारी, भारतीय महिला क्रिकेट संघ मध्य-विकेटवरून नेटकडे जात असताना नाले आणि स्टँडजवळ तपकिरी साप सरकताना दिसला. पण घाबरण्याऐवजी क्रिकेटपटूंनी ते उत्सुकतेने पाहिले. त्यांच्यासोबत सहाय्यक कर्मचारी आणि मीडियाचा एक गट होता.
महिला विश्वचषकातील भारतीय संघाचा दुसरा सामना रविवारी कोलंबोमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात सह-यजमान श्रीलंकेवर सहज विजय मिळवला होता. आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष संघाने घेतलेल्या भूमिकेनंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे