ऐन दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'धक्का'
मुंबई, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : एकीकडे दसर्‍याच्या आधी महापुराच्या तडाख्यात राज्यातील शेतकऱ्यांसह अनेक जणांचे संसार, शेती पुरते वाहून गेले. त्यातून अजून पूर्णपणे बाहेर आला नाही तर ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढीचा धक्का दिला आहे. इंधन समायोजन
वीज


मुंबई, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : एकीकडे दसर्‍याच्या आधी महापुराच्या तडाख्यात राज्यातील शेतकऱ्यांसह अनेक जणांचे संसार, शेती पुरते वाहून गेले. त्यातून अजून पूर्णपणे बाहेर आला नाही तर ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढीचा धक्का दिला आहे. इंधन समायोजन शुल्क लादल्याने ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. परिणामी, ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या वीज दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे.

महावितरणने नुकतेच एक परिपत्रक जारी करत सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहे. तर पुढील आदेशापर्यंत ही दरवाढ लागू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकांना दरवाढ करण्यात आल्याचा महावितरणचा दावा आहे. तर 9 पैसे दरवाढ झाल्याची माहितीही पुढील आदेशापर्यंत सुरुच राहणार आहे. सोबतच, पुढील काही वर्षात वीजेचे दर कमी होणार असल्याचं सुतोवाच देखील महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 100 युनिट वापरावर प्रति युनिट 35 पैसे आणि 500 युनिटपेक्षा अधिक वापरावर 95 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहेत. वीज मागणी वाढल्यामुळे खुल्या बाजारातून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला, अशी माहिती महावितरणने दिली.

वीज दरवाढ

1-100 युनिट - 35 पैसे

101- 300 युनिट - 65 पैसे

301-500 युनिट - 85 पैसे

501 पेक्षा जास्त - 95 पैसे

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनवरही इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले आहे. त्यामुळे आता चार्जिंगसाठी प्रति युनिट ४५ पैसे अधिक द्यावे लागतील. मेट्रो व मोनोरेलसाठी ४५ पैसे प्रति युनिट अधिक द्यावे लागणार आहेत. शेतकऱ्यांनाही वीज दरात प्रति युनिट ४० पैसे अधिक द्यावे लागणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande