अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
नायलॉन मांजावर पंतग उडविणाऱ्या लहान मुलांच्या ताब्यातून नागपुरी गेट पोलिसांनी ५५ नायलॉन मांजा व चक्री जप्त केल्या आहेत.
नायलॉन मांजावर बंदी असतानाहीशहरात मोठ्या प्रमाणात सर्रास चायना नायलॉन मांजा मिळतो. नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत तर अनेक दुकानात नायलॉन मांजा खुलेआम विकला जातो. गेल्या काही दिवसांपासून नागपुरी गेट हद्दीतील लहान मुले नायलॉन मांजाने पंतग उडवून पेचा लावतांना पोलिसांना दिसत होते. तसेच अन्य परिसरात सुध्दा लहान मुले सर्रास नायलॉन माजावर पंतग उडवितांना दिसताच सुरक्षेच्या दृष्टीने व कोणाला इजा होणार नाही या उद्देशाने नागपुरी गेट पोलिसांनी आपल्या हद्दीतील पंतग उडविणाऱ्या बऱ्याच लहान मुलांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना विश्वासातघेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण ५५ नायलॉन मांजा व चक्री जप्त केली. तसेच भविष्यात मुलांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये याकरिता परिसरातील मशिदीमधील मौलवीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी