बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका 3-0ने जिंकली
शारजाह, 6 ऑक्टोबर (हिं.स.)टी-२० मालिकेत बांगलादेशने अफगाणिस्तानचा ३-० असा पराभव केला आहे. शारजाह येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात बांग्लादेशने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफ
बांगलादेशचा विजयी संघ


शारजाह, 6 ऑक्टोबर (हिं.स.)टी-२० मालिकेत बांगलादेशने अफगाणिस्तानचा ३-० असा पराभव केला आहे. शारजाह येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात बांग्लादेशने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने २० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात १४३ धावा केल्या. १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने १८ षटकांत ४ विकेट्स गमावून विजय मिळवला. बांगलादेशकडून नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या सैफ हसनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अफगाणिस्तानकडून दरवेश अब्दुल रसूलीने २९ चेंडूत सर्वाधिक ३२ धावा केल्या. सेदिकुल्लाह अटलने २८ आणि मुजीब उर रहमानने २३ धावा केल्या. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीनने ३ षटकांत १५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. नसुम अहमद आणि तन्झिम हसन सकीबने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. शोरिफुल इस्लाम आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली. बांगलादेशकडून सैफ हसनने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूत सात षटकार आणि दोन चौकारांसह ६४ धावा केल्या. तन्झिद हसनने ३३ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने दोन विकेट्स घेतल्या. अजमतुल्लाह उमरझाईने तीन षटकांत १२ धावा देत एक विकेट घेतली. रशीद खानने चार षटकांत १३ धावा दिल्या पण एकही विकेट घेऊ शकला नाही. बांगलादेशने टी२० मालिकेतील पहिला सामना चार विकेट्सनी आणि दुसरा सामना दोन विकेट्सनी जिंकला. टी२० मालिकेनंतर ८ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande