आर्क्टिक बॅडमिंटन ओपनमध्ये लक्ष्य आणि किदाम्बी श्रीकांतकडून अपेक्षा
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर (हिं.स.)लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आर्क्टिक ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य ठेवतील. दोन्ही भारतीय बॅडमिंटनपटूंना हंगामातील त्यांचे पहिले विजेतेपद जिंकण्याची चांगली
लक्ष्य सेन


नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर (हिं.स.)लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आर्क्टिक ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य ठेवतील. दोन्ही भारतीय बॅडमिंटनपटूंना हंगामातील त्यांचे पहिले विजेतेपद जिंकण्याची चांगली संधी आहे. लक्ष्यला पहिल्या फेरीत जपानच्या पाचव्या मानांकित कोडाई नारोकाकडून कठीण आव्हान मिळेल. श्रीकांतचा सलामाची सामना रासमुस गेमकेविरुद्ध असणार आहे.

या हंगामात लक्ष्य फक्त हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आणि तो उपविजेता राहिला. २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्याला नारोकाला पराभूत करण्यासाठी त्याला चांगलचे कष्ट करावे लागणार आहेत. त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे मजबूत बचाव आहे आणि तो कमकुवत खेळाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीकांतला संपूर्ण हंगामात सातत्याच्या अभावाचा सामना करावा लागला आहे. डॅनिश बॅडमिंटनपटूवर मात करण्यसाठी श्रीकांतला तांत्रिक विविधता आणि नेटवरील नियंत्रणावर अवलंबून राहावे लागेल.

भारताच्या युवा बॅडमिंटनपटूंमध्ये यावर्षी अमेरिकन ओपन सुपर ३०० मध्ये पहिले BWF विजेतेपद जिंकणारा आयुष शेट्टीला पहिल्या फेरीत थायलंडच्या अव्वल मानांकित कुनलावूत विटिडसारचे आव्हान असेल. मकाऊ ओपन सुपर ३०० च्या उपांत्य फेरीत पोहोचलेला थरुन मन्नेपल्लीचा सामना फ्रान्सच्या सातव्या मानांकित टोमा ज्युनियर पोपोव्हशी होणार आहे. इंडिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणारा किरण जॉर्जला पहिल्या फेरीत जपानच्या कोकी वातानाबेशीचे आव्हान मोडित काढावे लागणार आहे. एस. शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यमला पहिल्या फेरीत फ्रान्सच्या तिसऱ्या मानांकित क्रिस्टो पोपोव्हकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

महिला एकेरीत, तान्या हेमंत पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या हुआंग चिंग पिंगशी, तर अनमोल खरबचा सामना सहाव्या मानांकित चिनी तैपेईच्या लिन झियांगशी होईल. महिला दुहेरीत, कविप्रिया सेल्वम आणि सिमरन सिंघी यांचा सामना पाचव्या मानांकित हाँगकाँगच्या येउंग नगा टिंग आणि येउंग पुई लाम यांच्याशी होईल. तर ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांचा सामना मिश्र दुहेरीत फ्रान्सच्या लुकास रेनोइर आणि कॅमिल पोगंट यांच्याशी होईल. मोहित जगलान आणि लक्षिता जगलान ही युवा जोडी ब्रायन वासिंक आणि डेबोरा झिली या डच जोडीशी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande