बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण
क्रीडा कार्यक्रमांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी देवू नये, अशी मागणी बीडचे जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी केला आहे.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे क्षीरसागर यांनी भेट देत मैदानाची पाहणी केली. तेथील झालेली दुरवस्था पाहता जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन, मुख्याधिकारी श्री.शैलेश फडसे यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सुधारणा व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी माजी नगरसेवक शुभम धूत, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम, अशोक शेळके, लारा वाघमारे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis