बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
कल्पतरू बीड, अखिल भारतीय नाट्य परिषद व मराठी नाट्य कलाकार यांच्या संयुक्त विद्यमाने बीड व शिरूर कासार तालुक्यातील विविध गावातील घरात पाणी शिरलेल्या पूरग्रस्तांना ६०० किराणा किटचे वाटप केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते भागवत तावरे यांच्यासह ऋतुराज फडके, प्रसाद दाने, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी, ललित कुलकर्णी हे कलाकार उपस्थित होते.
बीड व शिरूर का. तालुक्यातील हिंगणी खुर्द, जेबा पिंपरी, कपिलधारवाडी, आर्वी, मार्करवाडी, शिरापूर गात, फुलसांगवी, गाजीपूर, हाजीपूर, तरडगव्हाण, हिवरसिंगा, जांब, ढोकवड, कमळेश्वर धानोरा, साक्षाळपिंपरी, उमरद जहागीर, बहादरपूर आदी गावांचा समावेश होता.
तसेच जेबापिंपरी येथे ग्रा.पं.सदस्य शौकत रशीदभाई सय्यद यांच्या मैत्री प्रतिष्ठान पुणेच्यावतीने देखील साहित्य वाटप करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis