बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। कपिलधारवाडी, ता. जि. बीड येथे गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा प्रकोप सतत वाढत आहे. गावातील रस्ते आणि इमारतींना गंभीर तडे जाऊन त्या खचण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत. रस्ता पाच फुटाणे खचला आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
परिस्थिती गंभीर आहे आज रस्ता आणखी 5 फुटांनी खचला आहे. गावातील सर्व नागरिक, महिला व विद्यार्थी भीतीच्या वातावरणात दिवस काढत आहेत.प्रशासनाचे या परिस्थितीकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले असून त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. शासन व प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास, कपीलधारवाडी येथे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते.गावातील शाळा, घरे आणि सार्वजनिक ठिकाणे यावर गंभीर संकट आले आहे.
प्रशासनाने तातडीने जागेवर पोहोचून परिस्थितीचे परीक्षण करून बचाव व पुनर्वसनाची पावले उचलावीत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व आपत्कालीन मदत आणि साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी.कपिलधारवाडीतील जनतेच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आणि ठोस कारवाई व्हावी, हीच शासन व प्रशासनाकडे मागणी.राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बीड यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis