लातूर - नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरला सदस्य पदाची आरक्षण सोडत
लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर रोजी सदस्य पदाची आरक्षण सोडत होणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाच
लातूर - नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरला सदस्य पदाची आरक्षण सोडत


लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर रोजी सदस्य पदाची आरक्षण सोडत होणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या आरक्षण सोडतीला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

उदगीर नगरपरिषद सदस्य पदाची आरक्षण सोडत उदगीर नगरपरिषद सभागृहात, अहमदपूर नगरपरिषद सदस्य पदाची आरक्षण सोडत अहमदपूर पंचायत समिती सभागृहात, निलंगा नगरपरिषद सदस्य पदाची आरक्षण सोडत निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालयात, औसा नगरपरिषद सदस्य पदाची आरक्षण सोडत औसा तहसील कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आणि रेणापूर नगरपंचायत सदस्य पदाची आरक्षण सोडतरेणापूर तहसील कार्यालय येथे होणार आहे. उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा येथील आरक्षण सोडतीसाठी संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांना, तर रेणापूर येथील सोडतीसाठी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande