छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षण निश्चितीसाठी गुरुवार दि.१६ रोजी दु.१२ वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही बैठक होणार आहे. जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांना सध्या लागु असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेचच येणाऱ्या दिवासापासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमाती सह) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील) यांच्यासाठी राखुन ठेवायाच्या पंचायत समिती सभापती पदे नेमुन दिले आहे. त्यासाठी आयोजित बैठकीस राष्ट्रीय, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis