सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असून पूरग्रस्त भागात वेळीच मदत पोहोचल्याने जीवित हानी झाली नसून ९ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांन
Collactor kumar


सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असून पूरग्रस्त भागात वेळीच मदत पोहोचल्याने जीवित हानी झाली नसून ९ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना सांगितले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव, केवड, वाकाव या पूरग्रस्त गावांचा दौरा केला. ज्या ठिकाणी पायी जाणे अशक्य होते अशा ठिकाणी थेट ट्रॅक्टरमध्ये बसून ग्रामस्थांसमवेत त्यांनी बांधा बांधावर जाऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ८८ गावांना या महापुराचा फटका बसला असून उभी पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी जमिनीची माती खरवडून वाहून गेलेली आहे. या सर्व शेतीचे पंचनामे सध्या सुरू असून आठ ते नऊ ऑक्टोबरपर्यंत हे पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande