आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ ‘स्टेटस’ ठेवणाऱ्या आरोपींची नाना पेठेत धिंड
पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ समाजमाध्यमात धमकीचे ‘स्टेटस’ ठेवणाऱ्या पाच जणांना समर्थ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पाज जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पीयूष बिडकर, अथर्व न
newss


पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ समाजमाध्यमात धमकीचे ‘स्टेटस’ ठेवणाऱ्या पाच जणांना समर्थ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पाज जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पीयूष बिडकर, अथर्व नलावडे, ओंकार मेरगू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी धमकी देणारे ‘स्टेटस’ समाजमाध्यमातील खात्यावर ठेवले होते. सराइतांकडून समाजमाध्यमात प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशांवर पोलिसांनी नजर ठेवली होती. आंदेकर टोळीतील सराइत भालेराव, बिडकर, नलावडे, मेरगु यांनी धमकीचे ‘स्टेटस’ ठेवल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ धमकीचे ‘स्टेटस’ ठेवून दहशत माजविल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.-----------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande