सोलापूर: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त
सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। विजयपूर रस्त्यावरील प्राणी संग्रहालयासमोर मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या महापालिकेच्या पथकाकडून हटविण्यात आल्या आहेत. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि मंडई विभागाने ही संयुक्त कारवाई केली. विजयपूर रोडवरील प
सोलापूर: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त


सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। विजयपूर रस्त्यावरील प्राणी संग्रहालयासमोर मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या महापालिकेच्या पथकाकडून हटविण्यात आल्या आहेत. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि मंडई विभागाने ही संयुक्त कारवाई केली. विजयपूर रोडवरील प्राणी संग्रहालयासमोरील मूर्तिकारांच्या अतिक्रमण करून टाकलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी एकूण २३ झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. महापालिकेचा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग तसेच मंडई विभागाच्या संयुक्त पथकाने सकाळपासूनच ही कारवाई हाती घेतली. या कारवाईदरम्यान २० झोपड्या हटविण्यात आल्या असून, उर्वरित ३ झोपड्यांसाठी १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदत दिली आहे. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेसीबीच्या साहाय्याने ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्यासह कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण, कुंभार, कट्टीमनी, आरोग्य निरीक्षक व कर्मचारी तसेच सदर बझार पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande