लाखात नेक ! परळीची लेक ! देशात नंबर एक ||
बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। आभा मुंडे ने परळीची मान उंचावली छत्रपती संभाजी नगर येथे पार पडलेल्या 17 व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धत बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील आभा गणेश मुंडे हिने 50 मीटर फ्री स्टाईल,100मी बॅकस्ट्रोक,तसेच 100मी बटरफ्लाय प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.
या दैदिप्यमान यशाची दखल घेत नोव्हेंबर महिन्यात हैदराबाद येथे होणाऱ्या 25 नॅशनल पॅरा स्विमिंग स्पर्धेसाठी आभा मुंडे ची निवड झाली आहे. दरम्यान नुकत्याच दिल्लीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पैरा योगा या प्रकारात आभा मुंडे हिने गोल्ड मेडल जिंकले आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis