अकोला, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात सेवानिवृत्त होत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट मात्र हे पुस्तक काही महिला कर्मचाऱ्यांनी फेकून देत या कर्मचाऱ्याला माफी मागायला भाग पाडलं.तर पुस्तक फेकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिवसेना ( UBT ) चे नेते अरविंद सावंत चांगलेच संतापले आहे. बुद्धी गहाण ठेवली असेल तर आणून हे पुस्तक वाचा असा खोचक सल्ला त्यांनी दिलाय.सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याचं स्वागत व्हायला हवं होतं, पण त्यांचं सन्मानचिन्ह असलेलं पुस्तक न वाचता फेकून देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे.तसेच, मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना शिस्त शिकवून मेमो द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. आमदारांना निधी मिळत नाही, हा सगळ्यात मोठा विनोद आहे असं ते म्हणाले. सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळत नसेल, तर विरोधी पक्षातील आमदारांची काय अवस्था असेल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.शिवसेनेच्या चिन्हाबाबत उद्या होणाऱ्या निर्णयावर भाष्य करताना त्यांनी शिवसेना न्यायासाठी तडफडत आहे, पण न्यायालयाने संविधानाच हसू उडवली असायची टीका त्यांनी केली आहे.
तसंच,खासदार नवनीत राणा यांना उद्देशून सावंत यांनी प्रतिक्रिया देत
अनेक वर्ष प्रकरणे न्यायप्रविष्ट ठेवून सत्तेचा उपभोग घेणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला.
घाणेरडा माणूस आहे, अशा नालायक लोकांबद्दल काय बोलावं?” याचबरोबर, बापाचं नाव पुसणारी ही माणसं आहेत,असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरही हल्लाबोल केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे