लातूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत शिवसेनेची मागणी आणि भूमिका पोहचली पाहिजे. शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण आहे, असे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज लातूर येथे सांगितले. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश असून पंजाब सरकार प्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी बळीराजाला अपेक्षा आहे, असेही दानवे म्हणाले
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांबाबत निष्ठूर भूमिका न घेता नुकसान भरपाई आणि कर्जमुक्ती व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चानिमित्त लातूर जिल्ह्यातील शिवसेना - उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
याप्रसंगी संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, नामदेव चाळक, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, सुनील बसपुरे, वसीम देशमुख, दिनेश जावळे, उमेश सातपुते, बालाजी जाधव, सुनीता चाळक, जयश्री उडगे व श्रद्धा जवळगेकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis