बीडच्या नाट्यकलावंत आणि कलाकारांनी पूरग्रस्तांना दिली मदत
बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। कल्पतरू बीड,अखिल भारतीय नाट्य परिषद व मराठी नाट्य कलाकार यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरातील पुरग्रस्त भागातील 240 कुटुंबांना किराणा व इत्यादी साहित्यांचे वाटप केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सारिका क्षीरसा
अ


बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।

कल्पतरू बीड,अखिल भारतीय नाट्य परिषद व मराठी नाट्य कलाकार यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरातील पुरग्रस्त भागातील 240 कुटुंबांना किराणा व इत्यादी साहित्यांचे वाटप केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सारिका क्षीरसागर यांच्यासह अनेकांची याप्रसंगी उपस्थिती होती.

ज्या भागात शहरात पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते याठिकाणी याचे वाटप केले,यामध्ये नाळवंडी नाका परिसर,प्रकाश आंबेडकर व आदि भागांचा समावेश होता.

यावेळी ऋतुराज फडके, प्रसाद दाने, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी, ललित कुलकर्णी हे कलाकार व अश्विनीताई गुंजाळ,दत्ता जाधव,गोरख काळे,संगीताताई वाघमारे,शकेरा शेख प्रेमराज गुंजाळ,उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande