अमरावती : गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57 वा पुण्यतिथी महोत्सव
अमरावती, 7 ऑक्टोबर (हिं.स.) वैदीक काळापासून दोन प्रकारच्या प्रार्थना भारत देशात होत आहे. एक वैयक्तिक प्रार्थना व दुसरी सामुदायिक प्रार्थना. वैयक्तिक प्रार्थना आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी करित असतो, तर सामुदायिक प्रार्थना ही विश्व शांतीच्या कल्याण
सामुदायिक प्रार्थना ही विश्व शांतीच्या कल्याणासाठी- ॲड. स्वप्निल महल्ले: गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57 वा पुण्यतिथी महोत्सव


अमरावती, 7 ऑक्टोबर (हिं.स.)

वैदीक काळापासून दोन प्रकारच्या प्रार्थना भारत देशात होत आहे. एक वैयक्तिक प्रार्थना व दुसरी सामुदायिक प्रार्थना. वैयक्तिक प्रार्थना आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी करित असतो, तर सामुदायिक प्रार्थना ही विश्व शांतीच्या कल्याणासाठी असते. राष्ट्रसंतांच्या विचारात विश्वशांतीचा संदेश आहे. त्यांनी विश्व के चालक प्रभू मुझे समझ दे विश्वकी, हा ताकतीचा विचार सांगितला आहे, असे प्रतिपादन अॅड. स्वप्निल महल्ले यांनी केले. गुरुकुंज मोझरी येथे ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी ॲड. महल्ले यांनी सामुदायिक प्रार्थनेवरील चिंतनात मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले की, सध्या जगात अनेक ठिकाणी लहान मोठी युद्ध होत आहेत. त्यामुळे अशांततेचा वातावरण निर्माण झाले आहेत. यामुळे तरी आपल्याला असे वाटत असले की, आपण सुरक्षित आहोत, परंतु उत्पादन असो की सेवा त्याची झळ भारत देशाला सुद्धा बसते. म्हणून विश्वाचे कल्याण होण्यासाठी जगाला शांततेची गरज असते. शिवाजी महाराजांच्या काळापासून तर स्वातंत्र्यापर्यंत आपल्याला मुलभूत बाबींसाठी झगडावे लागले. परंतु, पाश्चिमात्य देशात न्यूटनसारखे शास्त्रज्ञ होऊन गेल्यामुळे त्यांनी मानव कल्याणाच्या वेगळ्या वळणावरती व प्रगतीकडे घेऊन गेले. आजही भारतामध्ये बौद्धिक संपदेची कमतरता नाही. परदेशी लोक भारतीय बौद्धीक संपदा वापरून त्यांचा विकास साधून घेतात. दुसऱ्या महायुद्धात जपान देश पूर्णतः उद्ध्वस्त झाला होता. परंतु, त्या देशातील जनतेने मिरर आणि विंडो ही पद्धती स्वीकारून जपानला प्रगती पथावर घेऊन गेले. एकदा मिळालेले मानवी जीवन स्वर्गमय करायचे असेल तर या जीवनाला मूलभूत प्रश्नात न अडकता, मानव जन्माचे कल्याण करायचे आहे. तर आपल्याला सुद्धा जपानची मिरर व विंडो पद्धत स्वीकारावी लागेल. मिरर पद्धतीचा अर्थ असा की, झालेल्या चुका दुरूस्त करून प्रगती साधणे व विंडो पद्धती म्हणजे आपल्या हातून कुठले सत्कार्य घडत असेल, तर माझ्या गुरुंनी केले. सामुदायिक प्रार्थना जगाला तारणार आहे, हा विचार जगातील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी वर्षानुवर्ष लागणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायिक प्रार्थना विश्व शांतीसाठी तुम्हा-आम्हाला पूरक आहे. विश्वी होऊ शकेल, शांतता तेथे गावाची काय कथा सामुदायिक प्रार्थना करेल, एकता नित्यासाठी तुकड्या म्हणे, असे प्रतिपादन अॅड. महल्ले यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande