छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भोकरदन तालुक्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
भोरखेडा ता.भोकरदन येथे श्री प्रकाश त्र्यंबक पा. सोनवणे, श्री मोतीराम कडूबा सोनवणे आणि श्री राजाराम रामा गवळी यांनी शेकडो समर्थकांसोबत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.!
यावेळी उपस्थित सर्वांशी दानवे यांनी संघटनात्मक संवाद साधला. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis