नांदेड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात नैसर्गिक संकटातही शेतकऱ्याची अग्निपरीक्षा झाली. शेतातील सोयाबीनची गंजी जळून खाक झाली . यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील मौजे कोपरा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला अचानक आग लागून सर्व सोयाबीन जळून खाक झाले.
नैसर्गिक संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या घटनेमुळे आणखी आर्थिक संकट ओढवले आहे.
या घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांचे काका श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी तातडीने प्रत्यक्ष स्थळी भेट दिली . शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक ती सूचना केली.
यावेळी गावातील शंकर पाटील पवळे, नामदेव पाटील, अशोक पवळे, दिगांबर पाटील, रविकांत पवळे, मोतीराम डोईवाड, साहेबराव पवळे आणि बालाजी पाटील पवळे आदी शेतकरी उपस्थित होते. सर्वांनी मिळून नुकसान झालेल्या शेतकऱ्याला धीर देत शासनाकडून योग्य मदत मिळावी, अशी मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis