छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात कन्नड शहरात अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात भाजपा कार्यालय, शिक्षक पतसंस्था, पिशोर नाका, कन्नड येथे संपन्न झाला.
यावेळी अनेक महिलांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष श्री. संजय खंबायते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महिला सक्षमीकरण आणि विकास हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. आजच्या या सोहळ्यात अनेक महिलांनी भाजपा च्या कार्यसंस्कृतीवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे, ही अभिमानाची बाब आहे.”
या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ. श्री.संजय गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस श्री. विकास कापसे, भाजपा नेते श्री. मनोज पवार, मध्य मंडळ अध्यक्ष श्री. सुनील पवार, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत अग्रवाल, सरचिटणीस श्री. विष्णू राठोड, श्री. कैलास जाधव महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पवार, सौ. मालकर ताई, सौ. सुनीता ताई निंभोरे, यांच्या सह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोर्चा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis