नांदेड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी पन्नास हजार मदत द्या, पंचनाम्यानुसार भरीव मदत द्या अशा मागण्यासाठी जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आजनांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय शहरी भागातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
त्वरित
ओला दुष्काळ जाहीर करा!
हेक्टरी पन्नास हजार मदत द्या!
पंचनाम्यानुसार भरीव मदत द्या!
यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी, खा. रविंद्र चव्हाण यांच्यासह दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रदेश पदाधिकारी, जिल्हा व शहर कमिटीचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, सर्व विभाग व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis