पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)महापालिकेच्या प्रभागांची अंतिम रचना नुकतीच जाहीर झाली आहे. या रचनेनुसार आता मतदार याद्यांचे विभाजन, मतदान केंद्रांची निश्चिती आणि प्रभागनिहाय नियोजनाची प्रक्रिया सुरु होणार आहे. यासंदर्भात आज महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत बुथनिहाय नियोजन, मतदान केंद्रांची निवड आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये नागरिकांना घराजवळ व सोईचे मतदान केंद्र स्थापन करावेत अशा सूचना आयोगाने दिलेल्या आहेत. त्यानुसार पुणे शहरात मतदान केंद्राची ठिकाणे निश्चित करण्यासाठी जागा पाहणी सुरु करण्याचे आदेश आज बैठकीत देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु