पुरंदर विमानतळासाठी तीन गावांतील मोजणी पूर्ण
पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तीन गावांतील मोजणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंजवडी, उदाचीवाडी आणि एखतपूर या गावांतील ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, ८०७ एकर जागा लवकरच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे.
Air Plane


पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तीन गावांतील मोजणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंजवडी, उदाचीवाडी आणि एखतपूर या गावांतील ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, ८०७ एकर जागा लवकरच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे. दरम्यान, येत्या शनिवारपासून कुंभारवळण, खानवडी या दोन गावातील मोजणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमतिपत्रे दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणीप्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी पोलीस बंदोबस्तामध्ये मुंजवडी, उदाचीवाडी आणि एखतपूर या गावांतील ५० हेक्टर जमिनीची मोजणीप्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मोजणीप्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच मुंजवडीतील ७७ हेक्टर, एखतपूरमधील २०१ हेक्टर आणि उदाचीवाडी येथील ४५ हेक्टर अशी एकूण ३२३ हेक्टर म्हणजेच ८०७ एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande