अंबादास दानवे यांनी घेतली शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
नांदेड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या हंबरडा मोर्चाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली विधान परिषदेती
अ


नांदेड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या हंबरडा मोर्चाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली

विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मोर्चाचे आयोजन, शेतकऱ्यांचा सहभाग, तसेच राज्य सरकारला द्यायच्या मागण्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मोर्चाद्वारे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी याप्रसंगी शिवसेना उपनेते बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, बबनराव बारसे, भुजंग पाटील, संदेश देशमुख, गोपू पाटील,महानगप्रमुख प्रकाश मारावार, रोहिदास चव्हाण व वसीम देशमुख उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande