छ. संभाजीनगर - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्ह्याचा ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा
छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वेरुळ- घ्रुष्णेश्वर, पैठण या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांवर पर्यटक येण्याची संभावना लक्षात घेता जिल्ह्यात विविध सुविधांची निर्मिती करण्यासाठी ८७१९ को
Q


छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वेरुळ- घ्रुष्णेश्वर, पैठण या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांवर पर्यटक येण्याची संभावना लक्षात घेता जिल्ह्यात विविध सुविधांची निर्मिती करण्यासाठी ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.

हा आराखडा अधिक व्यापक, सुक्ष्म नियोजन युक्त व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी, समाजातील विविध घटक, तज्ज्ञ व्यक्ति यांची मते व माहिती विचारात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करण्यावर संबंधित विभागांनी भर द्यावा. सखोल नियोजन करुन आराखडा फेरसादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज नाशिक येथील कुंभमेळा विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनाची बैठक पार पडली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्त लाखो भाविक, पर्यटक, साधुसंत हे महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. त्यात जिल्ह्यातील वेरुळ आणि पैठण हे स्थळ महत्त्वाचे आहे. अंदाजे एक कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत येतील असा अंदाज घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

त्यात प्रामुख्याने परिवहन व वाहतूक व्यवस्था, मुलभूत सुविधा, भाविक पर्यटकांची सोय व राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक स्थळांचे जतन या महत्त्वाच्या बाबी विचाराधीन करुन सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande