कलाल समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू - आ. सत्तार
छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। कलाल समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आपण पाठपुरावा करू असा शब्द सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दिला आहे. त्यांनी कलाल समाजाच्या विविध मागण्यासंद
अ


छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। कलाल समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आपण पाठपुरावा करू असा शब्द सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दिला आहे. त्यांनी कलाल समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर ही ग्वाही दिली आहे.

कलाल समाजाचे भगवान सहस्त्रबाहु अर्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे यासह कलाल कलाल समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनास भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande