सुनील जोशी यांनी सोडली पंजाब किंग्जची साथ
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)पंजाब किंग्जचे फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक सुनील जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फ्रँचायझीला लेखी माहिती दिली. जोशी आता बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जबाबदाऱ्या स्वीकारू शकतात. पंजाब किंग्जच्य
सुनील जोशी


नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)पंजाब किंग्जचे फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक सुनील जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फ्रँचायझीला लेखी माहिती दिली. जोशी आता बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जबाबदाऱ्या स्वीकारू शकतात. पंजाब किंग्जच्या एका अधिकाऱ्याने जोशी यांच्या जाण्याला दुजोरा दिला आहे.

त्यांनी आगामी हंगामासाठी आपल्या अनुपलब्धतेची माहिती संघाला दिली आहे. ते एक अद्भुत व्यक्ती होते आणि त्यांचे फ्रँचायझीशी चांगले संबंध होते, पण आम्ही कोणाच्याही कारकिर्दीच्या वाढीला अडथळा आणू इच्छित नाही असे फ्रॅंचायझीचे म्हणणे आहे.

सुनील जोशी यांचा पंजाब किंग्जसोबतचा हा दुसरा कार्यकाळ होता. यापूर्वी त्यांनी २०२० ते २०२२ पर्यंत संघासोबत काम केले होते जेव्हा अनिल कुंबळे प्रशिक्षक होते. रिकी पॉन्टिंग प्रशिक्षक झाल्यानंतर २०२५ मध्ये ते संघात परतले. ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूशी त्यांचे खूप चांगले संबंध होते.

जोशी यांनी भारतासाठी १५ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते १९९६ ते २००१ पर्यंत टीम इंडियाचा भाग होते. पण ते कधीही संघात आपले स्थान पक्के करू शकले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande