स्मृती मानधनाचे आसीसी एकदिवसीय क्रमवारीत वर्चस्व कायम
दुबई, 7 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय महिला संघाची अनुभवी फलंदाज स्मृती मानधनाने अव्वल स्थानावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आयसीसीच्या ताज्या महिला फलंदाजी क्रमवारीत मानधनाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जरी मानधनाची फलंदाजी विश्वचषकात शांत राहिली असली आ
स्मृती मानधना


दुबई, 7 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय महिला संघाची अनुभवी फलंदाज स्मृती मानधनाने अव्वल स्थानावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आयसीसीच्या ताज्या महिला फलंदाजी क्रमवारीत मानधनाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जरी मानधनाची फलंदाजी विश्वचषकात शांत राहिली असली आणि तिने पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नसली तरी, मानधनाने क्रमवारीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

मानधनाने अव्वल स्थानावर कायम राहिले असले तरी, तिची आघाडी कमी झाली आहे. मानधनाचे ७९१ गुण आहेत, ज्यामुळे ती इंग्लंडच्या नॅट सायव्हर ब्रंटपेक्षा ६० गुणांनी पुढे आहे. महिला विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या महिला एकदिवसीय मालिकेत सलग दोन शतके झळकावणारी मानधनाने श्रीलंकेविरुद्ध फक्त 8 आणि पाकिस्तानविरुद्ध २३ धावा काढल्या.

ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी ७१३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची ताजमिन ब्रिट्स आणि ऑस्ट्रेलियाची अ‍ॅशले गार्डनर सध्या आयसीसी क्रमवारीत चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. ताजमिनने दोन स्थानांची प्रगती केली आहे. तर गार्डनरने सात स्थानांची प्रगती केली आहे. ज्यामुळे ती आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारीत पोहोचली आहे.

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन देखील सात स्थानांची प्रगती करत आठव्या स्थानावर पोहोचली आहे. तर कोलंबोमध्ये भारताविरुद्ध ८१ धावा काढणारी पाकिस्तानची फलंदाज सिद्रा अमीनने तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारीत १० व्या स्थानाची बरोबरी केली आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ७९२ गुणांसह गोलंदाजी क्रमवारीत आघाडीवर आहे. फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा ही टॉप १० मध्ये एकमेव भारतीय गोलंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande