क्लच चेस द लिजेंड दुर्नामेंट : विश्वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव्हमध्ये ३० वर्षांनंतर लढत रंगणार
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर (हिं.स.)माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव्ह बुधवारपासून सुरू होणाऱ्या ''क्लच चेस द लेजेंड्स टूर्नामेंट''मध्ये ३० वर्षांनंतर एकमेकांशी भिडणार आहेत. १२ सामन्यांची ही बुद्धिबळ स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेची एक
विश्वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव्ह


नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर (हिं.स.)माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव्ह बुधवारपासून सुरू होणाऱ्या 'क्लच चेस द लेजेंड्स टूर्नामेंट'मध्ये ३० वर्षांनंतर एकमेकांशी भिडणार आहेत. १२ सामन्यांची ही बुद्धिबळ स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम १४४,००० डॉलर्स आहे. नूतनीकरण केलेल्या सेंट लुईस चेस क्लबमध्ये ही स्पर्धा होणार आहे. १९९५ मध्ये न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १०७ व्या मजल्यावर शास्त्रीय जागतिक अजिंक्यपद सामना खेळल्यानंतर, हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा रॅपिड आणि ब्लिट्झ स्वरूपात आमनेसामने येतील. ज्याचे नाव अलीकडेच फ्रीस्टाइल बुद्धिबळ असे ठेवण्यात आले आहे.

आनंदविरुद्धच्या सामन्यात कास्पारोव्हने वर्चस्व गाजवले होते. आणि २० सामन्यांचा सामना १०.५-७.५ असा जिंकला होता. २००४ मध्ये निवृत्त झाल्यापासून कास्पारोव्ह फक्त मैत्रीपूर्ण किंवा ब्लिट्झ स्पर्धांमध्ये खेळला आहे, तर आनंद आता अधूनमधून टॉप स्पर्धांमध्ये भाग घेतो.

या तीन दिवसांच्या स्पर्धेत दररोज चार सामने खेळले जाणार आहेत. दोन रॅपिड आणि दोन ब्लिट्झ. पहिल्या दिवशी चार गुण धोक्यात असले तरी, दुसऱ्या दिवशी गुण दुप्पट केले जाणार आहेत. प्रत्येक विजयासाठी दोन गुण दिले जातील. तिसऱ्या दिवशी प्रत्येक विजयासाठी तीन गुण दिले जाणार आहेत.हा सामना आता फ्रीस्टाइल बुद्धिबळ म्हणून ओळखला जातो. जिथे खेळाडूंना पारंपारिक सीमांबाहेर खेळण्याची परवानगी आहे. बुद्धिबळ चाहत्यांसाठी हा सामना केवळ दोन दिग्गजांमधील संघर्ष नाही तर तीन दशकांच्या जुन्या प्रतिस्पर्ध्याना पुन्हा खेळताना पाहण्याची नामी संधी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande