खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली वांजळे कुटुंबियांची भेट
पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पुण्यात वांजळे कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीमुळे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धडधड वाढली आहे. त्याचं कारण वां
खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली वांजळे कुटुंबियांची भेट


पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पुण्यात वांजळे कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीमुळे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धडधड वाढली आहे. त्याचं कारण वांजळे कुटुंबातील दोन सदस्य सद्य घडीला या दोन वेगवेगळ्या पक्षात आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात एका रहिवासी सोसायटीतील कामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सुळे यांनी मनसेचे माजी आमदार स्व. रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे आणि मुलगी सायली वांजळे यांची भेट घेतली.

या भेटीमुळे भाऊ-बहीण नवीन राजकीय वाट निवडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मयुरेश वांजळे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) सक्रिय असून, त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीनंतर त्यांची पक्षातील सक्रियता कमी झाल्याची चर्चा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande