लातूर - तांडा विकास योजनेतून १४ गावातील कामांसाठी ७० लाखांचा निधी मंजूर
लातूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा वार्षिक योजनेतून तांडा विकास योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १४ गावातील विविध विकास कामासाठी ७० लक्ष रुपयाचा निधी भाजपाचे नेते आ. रमेश आप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहेत सदरील निधी मंज
लातूर ग्रामीणचे आमदार कराड यांच्या प्रयत्नाने तांडा विकास योजनेतून १४ गावातील कामांसाठी ७० लाखांचा निधी मंजूर


लातूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा वार्षिक योजनेतून तांडा विकास योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १४ गावातील विविध विकास कामासाठी ७० लक्ष रुपयाचा निधी भाजपाचे नेते आ. रमेश आप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहेत सदरील निधी मंजूर झाल्याने त्या त्या गावातील भाजपा कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध गावात तांडा विकास योजनेअंतर्गत निधी मिळावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे भाजप नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. केलेल्या प्रयत्नामुळे लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात लातूर तालुक्यातील ६ गावात रेणापूर तालुक्यातील ५ आणि भादा सर्कल मधील ३ गावात आशा एकूण १४ गावात प्रत्येकी ५ लक्ष रुपये याप्रमाणे ७० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

तांडा विकास योजनेतून लातूर तालुक्यात भोयरा, भातांगळी, बामणी, कृष्णनगर, चिकुर्डा, जेवळी, रेणापूर तालुक्यातील खरोळा, जवळगा, नरवटवाडी, फरदपूर, बिटरगाव आणि औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील कवठाकेज, सत्‍तधरवाडी, शिंदाळा लो. या गावांना प्रत्येकी ५ लक्ष असे एकूण ७० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर निधीतून त्या त्या गावात सिमेंट रस्ता, सभागृह बांधकाम, पेव्हर ब्लॉक, जलशुद्धीकरण यंत्र, नाली बांधकाम, विद्युतीकरण यासह विविध कामे केली जाणार आहेत. सदरील तांडा विकास योजनेअंतर्गत निधी मिळालेल्या त्या त्या गावातील भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिकांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande