मुनीबा अलीला धावचीत देण्याचा निर्णय योग्यच; एमसीसीचे स्पष्टीकरण
कॅनबेरा, 7 ऑक्टोबर (हिं.स.)मेरीलेबोन क्रिकेट क्लबने पाकिस्तानची सलामीवीर मुनीबा अलीच्या धावबाद होण्याभोवतीच्या वादाचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, तिसऱ्या पंचाचा निर्णय पूर्णपणे योग्य आणि नियमांनुसार होता. ही घटना रविवारी भारत आणि पाकिस्तान या
मुनीबा अली


कॅनबेरा, 7 ऑक्टोबर (हिं.स.)मेरीलेबोन क्रिकेट क्लबने पाकिस्तानची सलामीवीर मुनीबा अलीच्या धावबाद होण्याभोवतीच्या वादाचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, तिसऱ्या पंचाचा निर्णय पूर्णपणे योग्य आणि नियमांनुसार होता. ही घटना रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यादरम्यान घडली होती. या सामन्यात भारताने ८८ धावांनी विजय मिळवला होता.

पाकिस्तानने २४८ धावांचा पाठलाग करताना, चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुनीबा अलीला एलबीडब्ल्यू निकाल देण्यात आला. पण ती क्रिजमधून बाहेर पडताच, दीप्ती शर्माचा थ्रो स्टंपवर आदळला. मुनीबाची बॅट सुरुवातीला क्रिजमध्ये होती. पण चेंडू लागला तेव्हा ती हवेत होती. थर्ड अंपायर करिन क्लास्टे यांनी तिला धावबाद घोषित केले होते.

पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना खानने या निर्णयाचा निषेध करत म्हटले की, मुनीबा धावण्याचा प्रयत्न करत नव्हती. आणि तिची बॅट क्रिजमध्ये होती. पण एमसीसीने निर्णयाचे समर्थन करत म्हटले आहे की, हा निर्णय पूर्णपणे क्रिकेटच्या कायद्यांनुसार होता. कोणतीही चूक नव्हती.

एमसीसीने कायदा ३०.१.२ चा उल्लेख केला. या नियमात म्हटले आहे की, जर एखादा फलंदाज धावताना किंवा क्रीजकडे डायव्हिंग करताना त्याच्या शरीराचा कोणताही भाग (बॅट किंवा बॉडी) क्रीजच्या बाहेर जमिनीवर ठेवला आणि नंतर त्याचा संपर्क तुटला, तर तो बाद होणार नाही.

एमसीसीने स्पष्ट केले की, हा नियम फक्त धावणाऱ्या किंवा डायव्हिंग करणाऱ्या फलंदाजांना लागू होतो. मुनिबा धावत नव्हती किंवा डायव्हिंग करत नव्हती. तिने क्रीजच्या बाहेरून तिचा गार्ड घेतला आणि तिचे पाय कधीही क्रीजच्या आत आले नाहीत.

त्यांनी पुढे म्हटले की, मुनिबाची बॅट थोड्या वेळासाठी क्रीजमध्ये होती. पण चेंडू विकेटवर आदळला तेव्हा ती हवेत होती. ती धावत नव्हती किंवा डायव्हिंग करत नव्हती, त्यामुळे तिला 'बाउन्सिंग बॅट' नियमाचा फायदा झाला नाही. एमसीसीने म्हटले की तिसऱ्या पंचांनी योग्य नियमांचे पालन केले आणि त्याला धावबाद घोषित केले. भारताने पाकिस्तानला ४३ षटकांत १५९ धावांवर बाद करून मोठा विजय मिळवला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande