परभणी, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींना धडा मिळावा या मागण्यांसाठी सेलू शहरातील विविध क्षेत्रातील हजारो नागरिकांनी लोकमान्य टिळक पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड असा मूक मोर्चा काढला. या मोर्चा हजारो महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.
यावेळी मोर्चेकर्यांच्यावतीने प्रशासनास आपल्या मागण्यांसदर्भातील निवेदन सादर करण्यात आले.शहराची शांतता आणि सुसंस्कृत परंपरा अबाधित ठेवण्यासाठी तसेच महिलांमध्ये आणि मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी या पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा मोर्चेकर्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis