कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारत-पाक युद्धबंदीबाबत ट्रम्प यांच्या खोट्या दाव्यांना योग्य ठरवलं
वॉशिंग्टन, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खुशामत करण्यात व्यस्त आहेत. मंगळवारी (७ ऑक्टोबर) त्यांनी ट्रम्प यांची स्तुती करताना म्हटलं की, ते परिवर्तन घडवणारे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे,
कॅनडाच्या पंतप्रधान


वॉशिंग्टन, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खुशामत करण्यात व्यस्त आहेत. मंगळवारी (७ ऑक्टोबर) त्यांनी ट्रम्प यांची स्तुती करताना म्हटलं की, ते परिवर्तन घडवणारे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांनी ट्रम्प यांच्या खोट्या दाव्यांनाही योग्य ठरवलं. कार्नी यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाचा देखील उल्लेख केला.

ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान कार्नी म्हणाले, ‘‘आपण एक परिवर्तन घडवणारे अध्यक्ष आहात. अर्थव्यवस्थेमध्ये बदल, नाटो भागीदारांच्या संरक्षण खर्चाबाबतची बांधिलकी, भारत आणि पाकिस्तानपासून ते अझरबैजान आणि आर्मेनियापर्यंत शांततेच्या दिशेने प्रयत्न, तसेच इराणला दहशतवादाच्या शक्तीपासून कमकुवत करणे – हे सर्व तुमचं नेतृत्व असल्यानं शक्य झालं आहे.’’

एप्रिल महिन्यात पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारलेले कार्नी मे महिन्यात व्हाईट हाऊसला आले होते. ट्रम्प यांनी अनेक वेळा असा दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात मदत केली आहे. मात्र भारताने पाकिस्तानसोबत सैनिकी कारवाई थांबवण्यामध्ये कोणत्याही तृतीय पक्षाच्या भूमिकेला स्पष्टपणे नाकारले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande