अ‍ॅस्पेक्ट रिअ‍ॅलिटीतर्फे 17 वर्षांपासून प्रलंबित वरळी प्रकल्पाचे पुनरूज्जीवन
* फर्निश्ड 600 एसआरए घरांचे वितरण मुंबई, ९ ऑक्टोबर (हिं.स.) : 17 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी आणि अनिश्चिततेमुळे रेंगाळलेला वरळीतील शिवम उर्फ स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी (एसआरए) प्रकल्प अखेरीस पूर्णत्वाला जात आहे. अ‍ॅस्पेक्ट रिअ‍ॅलिटीने केलेल्या सफाईद
अ‍ॅस्पेक्ट रिअ‍ॅलिटी


* फर्निश्ड 600 एसआरए घरांचे वितरण

मुंबई, ९ ऑक्टोबर (हिं.स.) : 17 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी आणि अनिश्चिततेमुळे रेंगाळलेला वरळीतील शिवम उर्फ स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी (एसआरए) प्रकल्प अखेरीस पूर्णत्वाला जात आहे. अ‍ॅस्पेक्ट रिअ‍ॅलिटीने केलेल्या सफाईदार व निर्णायक हालचालींच्या मदतीने हा प्रकल्प 600 कुटुंबांना पूर्णपणे फर्निश्ड, राहण्यासाठी सुसज्ज घरांच्या माध्यमातून नवी सुरुवात देत आहे. यातून कंपनीने एसआरए विकास क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

गेल्या जवळपास दोन दशकांपासून वरळीतील झोपडपट्टीधारकांना कठीण परिस्थिती आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागत होता, कारण त्यांना आश्वासन देण्यात आलेल्या घरांची पूर्तता झालेली नव्हती. हा प्रकल्प रेंगाळल्यामुळे कुटुंबांना असुरक्षित, गर्दीसदृश परिस्थितीत योग्य घरं किंवा भरपाईविना राहावं लागत होतं. या प्रलंबाची इथल्या कुटुंबांना मोठी किंमत चुकवावी लागलेली असून कित्येक मूळ लाभार्थींचे घराची प्रगती न पाहाताच निधनही झालेले आहे.

अ‍ॅस्पेक्ट रिअ‍ॅलिटीने गेल्या वर्षी या प्रकल्पाचं काम हाती घेत आधीच्या डेव्हलपर्सची थकबाकी चुकती केली आणि नव्या फंडिंगसह बांधकामाची तातडीने सुरुवात केली. आपली अविरत बांधिलकी दर्शवत कंपनीने भाडेशुल्काची सर्व थकबाकी एकाच वेळी चुकती केली आणि इथल्या निर्वासित झालेल्या रहिवाशांसाठी अतिशय गरजेचा झालेला आर्थिक दिलासा मिळवून दिला.

नवीन एसआरए फ्लॅट्स राहण्यासाठी जवळपास तयार आहेत. एसआरए फ्लॅट्समध्ये फर्निचर व इतर घरगुती उपकरणे पुरवणारी अ‍ॅस्पेक्ट रिअ‍ॅलिटी हे पहिलेच बिल्डर ठरले असून त्यांनी या प्रकल्पाचे सोप्या आराखड्यापासून सुबक आणि सुसज्ज घरांत रुपांतर केले आहे.

300 चौरस फुटांच्या प्रत्येक घरात लिव्हिंग/डायनिंगसाठी जागा, स्वयंपाकघर, एक बेडरूम आणि बाथरूम व स्वतंत्र टॉयलेट देण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर सर्व आवश्यक सोयी येथे देण्यात आल्या असून त्यात थ्री सीटर सोफा, टीव्ही युनिट, सेंटर टेबल, क्वीन साइज बेड, ड्रेसिंग टेबल, वॉर्डरोब, ओव्हरहेड आणि बेस किचन कॅबिनेट्स यांचा समावेश आहे. त्याशिवाय प्रत्येक घरात महत्त्वाची उपकरणे – प्युअर ड्रॉप युव्ही वॉटर प्युरिफायर, सूर्या टु- बर्नर गॅस स्टोव्ह, हेयर 165 लीटर रेफ्रिजरेटर, राकोल्ड 1 लीटर गिझर आणि टर्बोटेक 32 इंची स्मार्ट टीव्ही यांचा समावेश आहे.

अ‍ॅस्पेक्ट रिअ‍ॅलिटीचे सीईओ केदार चाफेकर म्हणाले, ’17 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पापुढे मोठमोठी आव्हाने होती, मात्र आमच्या टीमने केलेल्या मेहनतीच्या जोरावर, दर्जाविषयी तडजोड न करता वेगाने बांधकाम पूर्ण करणे शक्य झाले. 600 एसआरए फ्लॅट्सचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हा प्रकल्प नीतीपूर्ण रियल इस्टेट विकास आणि प्रभावी सामाजिक पुनर्वसन या दोन्ही संकल्पना एकत्रितपणे राबवता येऊ शकतात याचे प्रतीक आहे.’

शिवमद्वारे अ‍ॅस्पेक्ट रिअ‍ॅलिटीने सामाजिक पुनर्वसन क्षेत्रातील आपली आतापर्यंतची कामगिरी नव्याने प्रस्थापित केली असून कंपनी आजवर मुंबईतील 2500 कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. हा प्रकल्प वरळीच्या केंद्रस्थान वसलेला असून तो आपली व्याप्ती, वेग तसेच सन्मान, स्थैर्य, कॉर्पोरेट अकाउंटेबिलिटीची ताकद यांचे आश्वासन नव्याने मांडणारा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande